TSK

TSK · ओब 1:18

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

आपल्या दासाने अपराध केला आहे हे आपला दास जाणून आहे; म्हणून पाहा, आज माझ्या स्वामीराजांच्या भेटीस्तव अवघ्या योसेफ घराण्यातून मीच पहिला आलो आहे.

यास्तव ज्याप्रमाणे आग धसकट खाऊन टाकते आणि जसे सुके गवत आगीच्या जाळात राख होऊन पडते, त्याप्रमाणे त्यांचे मूळ कुजणार आणि त्यांचा बहर धूळीसारखा उडला जाईल. कारण त्यांनी सेनाधीश परमेश्वराची आज्ञा मानण्यास, नकार दिला आणि इस्राएलाच्या पवित्र देवाच्या संदेशाचा त्यांनी तिरस्कार केला.

ते त्यांचा सर्व आत्मविश्वास भयामुळे गमावून बसतील, आणि त्यांचे सरदार परमेश्वराचा युद्धाचा झेंडा बघून घाबरतील ज्याचा अग्नी सियोनेत आहे आणि परमेश्वराची भट्टी यरूशलेमेत आहे, त्या परमेश्वराची ही घोषणा आहे.

तर “मानवाच्या मुला, आता तू आपल्यासाठी एक काठी घे आणि तिच्यावर लिही, यहूदा आणि त्याचे सहकारी इस्राएलाचे लोक यांच्यासाठी. आणि दुसरी काठी घे व तिच्यावर लिही, योसेफासाठी म्हणजे एफ्राईमाची शाखा व त्यांचे सहकारी सर्व इस्राएलाचे लोक यासाठी आहे.

त्यांच्या उड्या मारण्याचा आवाज, पर्वतावरून जाणाऱ्या रथांसारखा, धसकट जाळणाऱ्या आग्नीसारखा, युध्दासाठी सज्ज झालेल्या बलवानासारखा आहे.

ते प्यालांतून मद्य पितात आणि चांगल्या तेलाने आपणाला अभिषेक करतात. पण ते योसेफाचा नाश होत आहे, त्यावर शोक करीत नाहीत.”

कारण तुम्ही जसे माझ्या पवित्र पर्वतावर प्याला तशी सर्व राष्ट्रे सतत पीत राहतील, ते पितील आणि गिळतील आणि ते कधी अस्तित्वात होते की नव्हते, असे होतील.

ते गुंतागुंत झालेल्या काटेरी झुडपाप्रमाणे, आपल्या स्वत:च्या पिण्याने मस्त झालेले असले तरी ते वाळलेल्या धसकटाप्रमाणे भस्म होतील.

जर कोणी त्या पायावर सोने, चांदी, मौल्यवान दगड, लाकूड, गवत किंवा पेंढा यांनी बांधतो,