TSK

TSK · फिले 1:24

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ बर्णबा व शौलाने त्यांचे यरूशलेम शहरातील काम संपविल्यानंतर ते अंत्युखियाला परत आले, त्यांनी मार्क योहान याला त्यांच्याबरोबर घेतले.

बर्णबाची इच्छा होती की, ज्याला मार्क म्हणत त्या योहानाला बरोबर घ्यावे.

अद्रमुत्तिय येथील एका जहाजातून आम्ही जाणार होतो, हे जहाज आशियाच्या किनाऱ्यावरील बंदरे घेत पुढे जाणार होते, आम्ही या जहाजातून प्रवासास निघालो, तेव्हा मासेदोनियातील थेस्सलनीका येथे राहणारा अरिस्तार्ख आमच्याबरोबर होता.

¶ तरी मला माझा बंधू आणि सहकारी व सहसैनिक आणि तुमचा प्रेषित आणि माझी गरज भागवून माझी सेवा करणारा एपफ्रदीत ह्याला तुमच्याकडे पाठविण्याचे आवश्यक वाटले.

¶ माझा सोबतीचा बंदिवान अरिस्तार्ख तुम्हास सलाम सांगतो, तसाच बर्णबाचा भाऊबंद मार्क हाही तुम्हास सलाम सांगतो. (त्याच्याविषयी तुम्हास आज्ञा मिळाल्या आहेत. तो जर तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याचा स्वीकार करा.)

कारण देमास मला सोडून थेस्सलनीका शहरास गेला आहे कारण त्यास जगाचे सुख प्रिय आहे. क्रेस्केस गलतीया प्रांतास गेला आहे व तीत दालमतीया प्रांतास गेला आहे.

म्हणून आपण अशांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यामधे त्यांचे सहकारी होऊ.