TSK

TSK · फिलि 3:1

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

या गोष्टी तुमचा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच आणि त्याच्या समवेत खाव्या. आपली मुलेबाळे, दासदासी, वेशीच्या आतील लेवी यांना बरोबर घेऊन तिथे जाऊन त्या खा. जी कामे पार पाडली त्याबद्दल तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात आनंद व्यक्त करा.

¶ मग हन्ना प्रार्थना करून म्हणाली, “माझे मन परमेश्वराच्या ठायी आनंद पावत आहे; माझे शिंग परमेश्वराच्या ठायी उंच केले आहे; माझे मुख माझ्या शत्रूविरूद्ध धैर्याने बोलत आहे, कारण तू केलेल्या तारणाने मी आनंदीत होत आहे.

त्याच्या पवित्र नावाचा अभिमान धरा. जे परमेश्वरास शोधतात त्यांचे अंतःकरण आनंदीत होवो.

¶ मग परमेश्वरासमोर सर्व लोकांनी मोठ्या आनंदाने खाणेपिणे केले. दावीदाचा पुत्र शलमोन याला त्यांनी दुसऱ्यांदा राजा म्हणून परमेश्वरातर्फे अधिपती होण्यासाठी शलमोनाला आणि याजक म्हणून सादोकाला अभिषेक केला गेला.

नहेम्या म्हणाला, “आता जा आणि सुग्रास अन्न खा, गोड पेये प्या. ज्यांना असे खाणेपिणे करता आलेले नाही त्यांना आपल्यातले काही खाद्य-पेय पाठवा. परमेश्वराचा हा पवित्र दिवस आहे. दु:खी राहू नका, कारण परमेश्वराचा आनंदच तुमचे सामर्थ्य आहे.”

परंतु जे सर्व तुझ्यामध्ये आश्रय घेतात ते हर्ष करोत. ते कायमचे हर्षोनाद करो, कारण तू त्यांचे रक्षण करतोस. ज्यांना तुझे नाव प्रिय आहे, ते तुझ्यामध्ये आनंद करोत.

परमेश्वरामध्ये आनंद कर, आणि तो तुला तुझ्या हृदयाच्या इच्छेप्रमाणे देईल.

परमेश्वर राज्य करतो; पृथ्वी आनंदित होवो. अनेक द्वीपसमूह आनंदित होवो.

इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव करो. सियोनेचे लोक आपल्या राजाच्या ठायी आनंद करोत.

तू त्यांना उफणशील आणि वारा त्यांना वाहून दूर नेईल; वावटळ त्यांना विखरील. आणि तू परमेश्वराच्या ठायी हर्ष करशील, इस्राएलाच्या पवित्र प्रभूच्या ठायी तू उत्साह करशील.

माझ्या सेवकांच्या हृदयांत आनंदीपणा असल्याने ते सुखी होतील. पण तुम्ही दुष्ट प्रवृत्तीचे लोक रडाल, आणि आत्म्याच्या भंगाने तुम्ही आक्रंदन कराल.

म्हणून सियोनवासीयांनो, आनंदीत व्हा. आणि परमेश्वर तुमच्या देवामध्ये उल्हासित व्हा. कारण तुम्हास हितकर होईल इतका आगोटीचा पाऊस तो देतो, तो पहिली पर्जन्यवृष्टी योग्य प्रमाणाने देतो, आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडतो.

सियोन कन्ये, गा आणि हे इस्राएल, आनंदाने जल्लोष कर! यरूशलेमेच्या कन्ये, आनंद व उल्लास कर!

एखाद्या योद्ध्याप्रमाणे एफ्राईम खूश होईल, त्यांचे हृदय द्राक्षरसाने हर्षित होते तसे हर्षित होईल; त्यांचे लोक हे पाहतील आणि ते आनंदीत होतील. परमेश्वराच्याठायी त्यांचे हृदय आनंदीत होईल.”

आणि देव जो माझा तारणारा याच्या ठायी माझा आत्मा आनंदीत झाला आहे.

इतकेच नाही, पण आता ज्याच्या द्वारे आपण समेट स्वीकारला आहे तो आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपण देवाच्या ठायी अभिमान मिरवतो.

¶ शेवटी, प्रभूमध्ये बलवान होत जा आणि त्याच्या सामर्थ्याने सशक्त व्हा.

आणि त्याचाच तुम्हीही आनंद माना व माझ्याबरोबर आनंद करा.

¶ प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा सांगतो, आनंद करा.

¶ बंधूनो, शेवटी आम्ही तुम्हास विनंती करतो व प्रभू येशूमध्ये बोध करतो की, कोणत्या वागणूकीने देवाला संतोषवावे हे तुम्ही आम्हापासून ऐकून घेतले व तुम्ही त्याप्रमाणे वागत आहा, त्यामध्ये तुमची अधिकाधिक वाढ व्हावी.

¶ माझ्या बंधूंनो, ज्या ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळया परीक्षा येतात तेव्हा तुम्ही आनंदच माना.

¶ शेवटी सर्वजण एकमनाचे व्हा आणि एकभावाचे होऊन बंधुप्रेम बाळगणारे, कनवाळू व प्रेमळ मनाचे व्हा.

¶ या कारणास्तव, जरी तुम्हास या गोष्टी माहित आहेत आणि प्राप्त झालेल्या सत्यात तुम्ही स्थिर झाला आहा, तरी तुम्हास त्यांची नेहमीच आठवण देण्याची काळजी घेईन.