TSK

TSK · फिलि 4:13

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

तो थकलेल्यांना शक्ती देतो; आणि निर्बलांस नवचैतन्य देऊन ताकद देतो.

माझ्याविषयी कोणी म्हणेल, फक्त परमेश्वराच्याठायीच तारण व सामर्थ्य आहे. जे सर्व त्याच्यावर रागावले आहेत ते त्याच्यापुढे भीतीने दबकत लज्जित होऊन येतील.

‹तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्यावाचून त्यास आपल्याआपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हासही देता येणार नाही.›

¶ आणि ख्रिस्तामुळे देवाच्या ठायी आमचा असा विश्वास आहे.

त्याच्या गौरवाच्या विपुलतेनुसार त्याने तुम्हास असे द्यावे, देवाच्या आत्म्याद्वारे सामर्थ्य मिळून तुम्ही आपल्या अंतर्यामी बलवान व्हावे.

आणि तुम्हास सर्व धीर व आनंद देणारी सहनशीलता मिळण्यास त्याच्या गौरवाच्या बळाप्रमाणे तुम्हास संपूर्ण सामर्थ्य मिळून तुम्ही समर्थ व्हावे;