TSK

TSK · नीति 11:3

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

तुझा प्रामाणिकपणा आणि सरळपणा माझे रक्षण करोत. कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे.

निर्दोष व्यक्तीची सात्विक वागणूक त्याचे मार्ग सरळ करते, परंतु दुर्जन आपल्या दुष्टतेने पतन पावतो.

मनुष्याचा मूर्खपणा त्याच्या आयुष्याचा नाश करतो, आणि त्याचे मन परमेश्वराविरूद्ध संतापते.

जो सरळ मार्गाने चालतो तो सुरक्षित राहतो, पण ज्याचे मार्ग वाकडे आहेत तो अचानक पडतो.

बंडखोर व पापी यांचा एकत्र चुराडा होईल व ज्यांनी परमेश्वराचा त्याग केला त्यांचाही तसाच चुराडा होईल.