TSK

TSK · नीति 13:25

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

भुकेने ते कासावीस होतील. भयंकर प्रखर तापाने व भंयकर मरीने ग्रस्त होतील. वनपशू त्यांच्यावर सोडीन. विषारी साप व सरपटणारे प्राणी त्यांना दंश करतील.

परमेश्वरावर विश्वास ठेव आणि जे चांगले आहे ते कर; देशात स्थिर हो आणि विश्वासूपणाने आपला व्यवसाय कर.

परमेश्वर निर्दोषास दिवसेन दिवस बघतो, आणि त्यांचे वतन सदैव राहील.

परमेश्वर चांगल्यांना भुकेले राहू देत नाही, परंतु तो वाईटाची कामना निष्फळ करतो.

¶ तेव्हा, परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणाला, “माझ्या सेवकांना खायला मिळेल, पण तुम्ही भुकेले रहाल. माझ्या सेवकांना पाणी मिळेल, पण तुम्ही तहानलेले रहाल.” माझे सेवक सुखी होतील, पण तुम्ही लज्जित व्हाल.

कारण शरीराच्या कसरतीला अल्प महत्त्व आहे पण देवाच्या सेवेला सर्व प्रकारे महत्त्व आहे कारण ते सध्याच्या जीवनाविषयी आणि भविष्यातील जीवनाविषयी आशीर्वादाचे अभिवचन आहे.