TSK

TSK · नीति 14:8

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

परमेश्वराचे भय शहाणपणाची सुरुवात आहे; जे त्याप्रमाणे वागतात त्यास सुबुद्धी प्राप्त होते. त्याची स्तुती सर्वकाळ टिकून राहील.

मला बुद्धी दे म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; मी आपल्या अगदी मनापासून ते पाळीन.

सकाळी मला तुझ्या वात्सल्याचे शब्द ऐकू दे, कारण मी तुझ्यावर भरवसा ठेवला आहे. ज्या मार्गाने मी चालावे तो मला दाखव, कारण मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो.

जो योग्य मार्ग आहे त्याने मी चालते, ती वाट न्यायाकडे नेते,

नीतिमानाच्या योजना यथान्याय असतात, पण दुष्टांचा सल्ला कपटाचा असतो.

मूर्खाप्रमाणेच ज्ञान्याची आठवण सर्वकाळपर्यंत राहणार नाही. कारण पुढे येणाऱ्या दिवसात सर्वकाही अगदी विसरून जातील म्हणून शहाणा मनुष्य मूर्खासारखाच मरतो.

‹आणि मी माझ्या जीवाला म्हणेन, ‘हे जीवा, आता तुझ्यासाठी अनेक वर्षे पुरतील अशा पुष्कळ चांगल्या गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत. आराम कर, खा, पी आणि मजा कर.’›

म्हणून मूर्खासारखे वागू नका, तर उलट परमेश्वराची इच्छा काय आहे ते समजून घ्या.

पण दुष्ट लोक व भोंदू लोक इतरांना वरचेवर फसवत राहतील आणि स्वतःही फसून अधिक वाईटाकडे जातील.

¶ तुमच्यात ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने चांगल्या आचरणातून, ज्ञानीपणाच्या सौम्यतेने, आपल्या स्वतःची कृती दाखवावी.