TSK

TSK · नीति 16:19

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

जे हृदयाने तुटलेले आहेत, त्यांच्याजवळ परमेश्वर आहे. आणि तो खिन्न झालेल्या आत्म्यास तारतो.

कारण तुझ्यासमोर येणाऱ्या अधिपतीपुढे तुझा पाणउतारा करण्यापेक्षा, “वर येऊन बस” असे तुला म्हणावे हे अधिक चांगले आहे.

तू राष्ट्राची वृद्धी केली आहे तू त्यांचा आनंद वाढवला आहे, हंगामाच्या वेळी जसा आनंद होतो, लूट वाटून घेतांना जसा आनंद होतो तसा ते तुझ्यासमोर आनंद करीत आहेत.

कारण तो म्हणतो, “माझ्या शक्तीने व अकलेने मी वागलो आहे. मी सुज्ञ आहे, व राष्ट्रांच्या सीमा मी काढून टाकल्या आहेत, त्यांची भांडारे मी लुटली आहेत व शूर वीराप्रमाणे जे सिहांसनावर बसतात त्यांना खाली पाडले आहे.

कारण जो उंच व परम थोर आहे, जो सदासर्वकाळ राहतो, ज्याचे नाव पवित्र आहे, तो असे म्हणतो, मी उंच आणि पवित्र जागी राहतो, नम्र जनांच्या आत्म्याला पुनरुज्जीवित करायला, आणि पश्चातापी लोकांच्या हृदयाला पुनरुज्जीवित करायला, अनुतापी व नम्र आत्म्याचा जो आहे त्याच्याजवळही मी राहतो.

त्याने त्याच्या हाताने सामर्थ्याची कार्ये केली आहेत; जे गर्विष्ठ अंतःकरणाचे आहेत त्यांची त्याने पांगापांग केली आहे.