TSK

TSK · नीति 21:3

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

म्हणून मी म्हणालो बघ, मी आलो आहे. माझ्याविषयी पुस्तकात हे लिहिले आहे.

दुष्टाच्या अर्पणाचा परमेश्वर द्वेष करतो, पण सरळांची प्रार्थना त्याचा आनंद आहे.

चांगले करण्यास शिका; न्याय मिळवा, पीडितांची मदत करा, पितृहीनांना न्याय द्या, विधवांचे रक्षण करा.

कारण मी बलिदान नाही तर विश्वासूपण इच्छितो, मला होमबली पेक्षा देवाचे ज्ञान प्रिय आहे.

हे मनुष्या, चांगले ते त्याने तुला सांगितले आहे. आणि न्यायीपणाने वागने, दया व निष्ठा ह्यावर प्रेम करणे आणि आपल्या परमेश्वरासोबत नम्रपणे चालने. यांखेरीज परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो?

त्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे हे सर्व यज्ञ व अर्पणे, जी आपणास करण्याची आज्ञा दिली आहे, त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे.”