TSK

TSK · नीति 24:1

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

लोटाने सभोवार पाहिले, आणि यार्देन खोऱ्याकडे नजर टाकली तेव्हा तेथे सर्वत्र भरपूर पाणी असल्याचे त्यास दिसले. परमेश्वराने सदोम व गमोरा या शहरांचा नाश करण्यापूर्वी सोअराकडे जाते त्या वाटेने लागणारे खोरे परमेश्वराच्या बागेसारखे, मिसर देशासारखे होते.

पाप्यांसोबत किंवा रक्तपात करणाऱ्यांसोबत माझा प्राण काढून घेऊ नकोस.

परमेश्वरासमोर स्तब्ध राहा आणि धीराने त्याची वाट पाहा. जर मनुष्य दुष्ट योजना आखतो, कोणी आपले वाईट मार्ग सिद्धीस नेतो, तर काळजी करू नको.

जर ते म्हणतील “आमच्याबरोबर ये. आपण वध करण्यास वाट बघू; आपण लपू व निष्कारण निष्पाप व्यक्तीवर हल्ला करू.

दुष्टांचे मार्ग आचरणात आणू नको, आणि जे वाईट करतात त्यांच्या मार्गाने चालू नको.

शहाण्या लोकांबरोबर चाला म्हणजे तुम्ही शहाणे व्हाल, पण जर तुम्ही मूर्खांशी संगत केली तर तुम्ही संकटात पडाल.

जो कोणी वाईट गोष्टी करतो त्याची काळजी करू नको, आणि दुष्टांचा मत्सर करू नको.

किंवा ‘आपल्यात राहणारा पवित्र आत्मा ईर्षावान’, असे शास्त्रलेख व्यर्थ म्हणतो, असे तुम्हास वाटते काय?