¶ न्यायनिवाडा करताना कोणावर अन्याय करु नका तर योग्य न्याय द्या. न्यायदान करताना गरीब लोक व वजनदार लोक ह्याना विशेष मर्जी दाखवू नका. आपल्या शेजाऱ्याचा न्याय करताना योग्य तोच न्याय द्या.
TSK
TSK · नीति 24:23
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
त्यांनी नेहमी नि:पक्षपाती असले पाहिजे. त्यांनी लाच घेऊन न्यायनिवाडा करता कामा नये. पैसे पाहून भल्या भल्यांचेही डोळे फिरतात व ते निरपराध लोकांच्या म्हणण्याचा विपर्यास करतात.
कोठपर्यंत तुम्ही अन्यायाने न्याय कराल? आणि दुष्टांना पक्षपातीपणा दाखवाल?
ज्ञानी लोकांची वचने आणि त्याची गूढरहस्ये समजावी, म्हणून म्हणी व सुवचने ह्यासाठी ही आहेत.
ज्ञानाची वचने ऐकून घे आणि त्याकडे लक्ष दे, आणि आपले मन माझ्या ज्ञानाकडे लाव.
ज्ञानी मनुष्य कोण आहे? जीवनात काय घटना घडणार आहे हे कोणाला समजते? मनुष्यातील ज्ञान त्याचे मुख प्रकाशीत करते आणि त्याच्या मुखाचा कठीणपणा बदलतो.
‹तोंड पाहून न्याय करू नका तर यथार्थ न्याय करा.”›
तर, तुम्ही आपसात भेद ठेवता आणि दुष्ट विचार करणारे न्यायाधीश झालात ना?
आणि पक्षपात न करता, जो प्रत्येक मनुष्याचा कामाप्रमाणे न्याय करतो त्यास तुम्ही जर पिता म्हणून हाक मारता, तर तुमच्या प्रवासाच्या काळात तुम्ही भय धरून वागले पाहिजे.