मग हे सर्व तुमचे दास म्हणजे मिसरी लोक माझ्या पाया पडून माझी उपासना करतील. ते म्हणतील, तुम्ही तुमच्या सर्व लोकांसह व परिवारासह येथून निघून जा.” मग त्यानंतर रागाने संतप्त होऊन मोशे फारोला सोडून निघून गेला.
TSK
TSK · नीति 28:1
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
तुमच्यातील जे उरतील त्यांच्या मनात ते शत्रुंच्या देशात असता मी अशी भिती घालीन की, उडणाऱ्या पाचोळ्याच्या आवाजाने ते पळून जातील, तलवार पाठीमागे लागल्यासारखे ते पळतील; कोणी पाठीमागे लागले नसतांनाही ते पडतील.
तुम्ही तुमच्या शत्रूपुढे मार खाल असे परमेश्वर करील. शत्रूवर तुम्ही एका दिशेने चढाई कराल आणि सात दिशांनी पळ काढाल. तुमच्यावरील संकटे पाहून पृथ्वीवरील इतर लोक भयभीत होतील.
परमेश्वराच्या करणीने अरामी लोकांस आपल्यावर घोडे, रथ, विशाल सेना चालून येत आहे असा भास झाला तेव्हा ते आपापसात म्हणाले, “इस्राएलाच्या राजाने हित्ती आणि मिसरी राजांना द्रव्य देऊन आपल्यावर चाल करण्यास पाठवलेले दिसते.”
हे लोक अरामी सैन्याच्या मार्गावर यार्देन नदीपर्यंत गेले. वाटेवर सर्वत्र कपडे आणि शस्त्रे पडलेली त्यांना आढळली. घाईघाईने पळून जाताना अरामी लोक या वस्तू टाकून गेले होते. दूतांनी शोमरोनला परत येऊन हे राजाला सांगितले.
भीतीचा आवाज त्याच्या कानात आहे, जेव्हा तो समृद्धीत असेल, नाश करणारा त्याच्यावर येईल.
म्हणून जरी पृथ्वी बदलली, जरी पर्वत डगमगून समुद्राच्या हृदयात गेले, तरी आम्ही भिणार नाही.
अहो, सियोनातून इस्राएलाचे तारण येवो! जेव्हा देव आपल्या लोकांस बंदिवासातून परत आणील, तेव्हा याकोब आनंद करेल आणि इस्राएल हर्षित होईल!
जो कोणी प्रामाणिकपणे चालतो तो सुरक्षितपणे चालतो, परंतु जो कोणी त्याचे मार्ग वाकडे करतो तो कळून येईल.
परमेश्वरा, तुझ्यावर विसंबून असणाऱ्यांना आणि तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना, तू खरी शांती देतोस.
¶ शद्रख, मेशख, अबेदनगो यांनी राजाला उत्तर दिले की, “हे नबुखद्नेस्सरा, या बाबतीत उत्तर देण्याचे आम्हास प्रयोजन नाही.
तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, आणि ही निरक्षर व अशिक्षित माणसे आहेत, हे जाणून त्यांनी आश्चर्य केले, आणि हे येशूच्या संगतीत होते असे त्यांनी ओळखले.
परंतु पूर्वी फिलिप्पैत आम्ही दुःख भोगून व अपमान सोसून, हे तुम्हास माहीतच आहे, मोठा विरोध असता, देवाची सुवार्ता तुम्हास सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हास मिळाले.