TSK

TSK · नीति 30:17

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

तो थोडा द्राक्षरस प्याला आणि तो धुंद झाला. तो त्याच्या तंबूत उघडा-वाघडा पडला होता.

¶ एखाद्याचा मुलगा हट्टी व बंडखोर, अजिबात न ऐकणारा, आईबापांना न जुमानणारा असेल शिक्षा केली तरी त्यांचे ऐकत नसेल.

तुमच्या प्रेतांवर जंगली श्वापदे आणि पक्षी ताव मारतील आणि त्यांना हुसकावून लावायला कोणी असणार नाही.

अबशालोमचा दावीदाच्या अधिकाऱ्यांशी सामना झाला, तेव्हा अबशालोम खेचरावर बसून निसटायचा प्रयत्न करू लागला. ते खेचर एका मोठ्या एला वृक्षाच्या खालून जात असताना त्याच्या जाडजूड फांद्यामध्ये अबशालोमचे डोके अडकले. खेचर निघून गेले आणि अबशालोम अधांतरी लोंबकळत राहिला.

अय्याची कन्या रिस्पा हिने शोकाकुल होऊन एक मोठे कापड त्या गिबाच्या खडकावर अंथरले. तेव्हापासून पावसास सुरुवात होईपर्यंत ते तसेच राहू दिले. रिस्पाने रात्रंदिवस त्या मृत देहांची निगराणी केली. दिवसा पक्ष्यांनी आणि रात्री जंगली जनावरांनी त्याचे लचके तोडू नयेत म्हणून राखण केली.

तू आपल्या जन्मदात्या पित्याचे ऐक, तुझी आई म्हातारी झाली म्हणून तिचा तिरस्कार करू नको.