TSK

TSK · स्तोत्र 21:4

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

त्यांचा रक्तपात यवाबाच्या शिरी त्याच्या संततीच्या शिरी उलटवून सर्वदा राहील. पण दावीद, त्यांचे वंशज, त्याच्या घराण्यातील राजे आणि त्याचे राज्य यांना परमेश्वराच्या कृपेने निरंतर शांतता लाभेल.”

मग यहोयादाने योवाशाला बाहेर काढले. त्यास त्यांनी मुकुट घातला आणि आज्ञापट दिला. मग त्यांनी त्यास राजा करून त्याचा अभिषेक केला व टाळ्या वाजवून त्यांनी “राजा चिरायू होवो” म्हणून जयघोष केला.

कारण तू माझ्या जीवाला मृतलोकांत राहू देणार नाही, ज्याच्याजवळ तुझी प्रेमदया आहे, त्यास तू अधोलोक पाहू देणार नाहीस.

राजाचे नाव सर्वकाळ टिकून राहो; सूर्य आहे तोपर्यंत त्याचे नाव पुढे चालू राहो; त्याच्यात लोक आशीर्वादित होतील; सर्व राष्ट्रे त्यास धन्य म्हणतील.

त्याची संतती सर्वकाळ राहील, आणि त्याचे राजासन माझ्यासमोर सूर्याप्रमाणे कायम राहील.

मला कळवळा दाखव यासाठी की, मी जिवंत राहीन, कारण तुझे नियमशास्त्र माझा आनंद आहे.

सीयोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे आहे; कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे.

‹आणि जो जिवंत तो मी आहे; मी मरण पावलो होतो, पण तरी पाहा, मी युगानुयुग जिवंत आहे! आणि माझ्याजवळ मरणाच्या व मृतलोकाच्या किल्ल्या आहेत.›