TSK

TSK · रोम 11:13

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

परंतु प्रभू म्हणाला, ‹“जा, राजांना आणि परराष्ट्रांना आणि इस्राएलाचे संतान यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे.›

तेव्हा त्याने मला सांगितले, ‹“जा मी तुला मी परराष्ट्रीयांकडे दूर पाठवतो.”›

ती कृपा ह्यासाठी आहे की, तिच्या योगे, मी परराष्ट्रीयांसाठी देवाच्या सुवार्तेचे याजकपण करणारा, येशू ख्रिस्ताचा सेवक व्हावे; म्हणजे परराष्ट्रीय हे अर्पण पवित्र आत्म्याकडून पवित्र केले जाऊन मान्य व्हावे.

मला प्रकटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो आणि जे शुभवर्तमान मी परराष्ट्रीयात गाजवत असतो, ती मी त्यांच्यापुढे मांडले; पण जे विशेष मानलेले होते त्यांना एकांती मांडले; नाही तर, मी व्यर्थ धावतो किंवा धावलो, असे कदाचित् झाले असते.

जरी मी सर्व पवित्र जनांमध्ये अगदी लहानातील लहान आहे तरी मला हे ख्रिस्ताच्या गहन अशा संपत्तीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी हे कृपेचे दान मला दिले गेले,

मला त्या सुवार्तेचा घोषणाकर्ता, प्रेषित आणि शिक्षक असे नेमले होते.