TSK

TSK · रोम 14:11

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ तू त्यांना सांग, परमेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे. जसे तुम्ही माझ्या कानात बोलला तसे मी करीन.

अहो पृथ्वीच्या सर्व सीमांनो, माझ्याकडे वळा आणि तारण पावा; कारण मी देव आहे, आणि माझ्याशिवाय दुसरा देव नाही.

¶ “परमेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे, यहोयाकीमचा, यहूदाच्या राजा, याचा मुलगा, कोन्या, जरी तू माझ्या उजव्या हातातील मुद्रा असलास, तरीही मी तुला उखडून टाकले असते.

ह्यास्तव सैन्याचा परमेश्वर, इस्राएलाचा प्रभू असे म्हणतो, “मी जिवंत आहे, म्हणून मवाब सदोमासारखा होईल व अम्मोनवासी गमोरा यांसारखे होतील. ते एक निरुपयोगी ठिकाण व मिठाच्या खांचा व कायमचे ओसाड असे होतील. पण माझ्या लोकांतील राहिलेले त्यांना लूटतील, आणि माझ्या राष्ट्रातले शेष त्यांचे वतन पावेल.”

¶ कारण येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्यास मरण पावलेल्यांमधून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल.

ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा,

कारण फसवणूक करणारी, म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त ह्याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत. फसवणूक करणारा व ख्रिस्तविरोधक असलाच आहे.