TSK

TSK · रोम 4:20

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ एवढ्या लोकांस पुरेल एवढे मांस देण्यासाठी मी कोठे शोधू? ते माझ्याकडे आसवे गाळून रडत आहेत, ते म्हणतात आम्हास खावयास मांस दे!

पण या कारभाऱ्याने तेव्हा अलीशाला सांगितले, “परमेश्वराने आकाशाला खिंडार पाडले तरी हे होणार नाही!” यावर अलीशा त्या कारभाऱ्याला म्हणाला, “तू हे सर्व आपल्या डोळ्यांदेखत पाहशील पण तुला त्यातले काहीही खाता येणार नाही.”

एफ्राईमाचे शीर शोमरोन आणि शोमरोनाचे शीर रमाल्याचा पुत्र आहे. तू जर विश्वासात स्थिर राहिला नाहीस तर खात्रीने तू सुरक्षीत राहणार नाहीस.”

¶ नेरीयाचा मुलगा बारूख ह्याला खरेदीखताची पावती दिल्यावर, मी परमेश्वराची प्रार्थना केली आणि म्हणालो,

जे कराराविषयी दुष्टपण करतात त्यास तो फुस लावील, पण जे लोक आपल्या देवाला जाणतात ते बलवान होऊन मोठे काम करतील.

सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “आपले हात दृढ करा! सेनाधीश परमेश्वराने मंदिराच्या पुनर्निर्मितीच्या वेळी पाया घालताना, संदेष्ट्यांमार्फत जो संदेश दिला, तोच तुम्ही आज ऐकत आहात.

हे पाहून लोकसमुदाय थक्क झाला आणि ज्या देवाने मनुष्यास एवढा अधिकार दिला त्याचे त्यांनी गौरव केले.

जिने विश्वास ठेवला ती धन्य आहे, कारण ज्या गोष्टी प्रभूने तिला सांगितल्या त्याची पूर्णता होईल?

आणि म्हणून ख्रिस्तासाठी आजारात, अपमानात, आपत्तीत, पाठलागात आणि दुःखात मी संतुष्ट असतो कारण मी जेव्हा अशक्त असतो तेव्हाच सशक्त आहे.

¶ माझ्या मुला तू ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान हो.