येशूने त्यास म्हटले, ‹“मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही.›
TSK
TSK · रोम 8:6
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
‹तर आता, हे माझ्या पित्या, हे जग होण्याआधी तुझ्याबरोबर मला जे गौरव होते त्याच्यायोगे तू आपणा स्वतःबरोबर माझे गौरव कर.›
कारण आपण वैरी होतो, तेव्हा जर आपला देवाबरोबर, त्याच्या पुत्राच्या मरणाने समेट केला गेला, तर त्याहून अधिक हे आहे की, आपला समेट केला गेल्यामुळे त्याच्या जीवनाने आपण निश्चित तारले जाऊ.
कारण पापाचे वेतन मरण आहे, पण आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे सार्वकालिक जीवन हे देवाचे कृपादान आहे.
पण पापाने आज्ञेची संधी घेतली आणि मला फसवले व तिच्या योगे ठार मारले.
कारण तुम्ही जर देहानुसार जगाल तर तुम्ही मराल, पण तुम्ही आत्म्याच्या योगे शरीराच्या कृती मारून टाकल्या तर तुम्ही जिवंत रहाल.
कारण खाणे किंवा पिणे ह्यात देवाचे राज्य नाही; पण नीतिमत्त्व, शांती व पवित्र आत्म्यातील आनंद ह्यात आहे.
कारण जो आपल्या देहाकरता पेरतो त्यास देहाकडून नाशाचे पीक मिळेल, पण जो देवाच्या आत्म्याकरता पेरतो त्यास आत्म्याकडून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल.