TSK

TSK · रोम 9:31

مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.

العودة إلى المقطع

¶ “जे तुम्ही न्यायाला अनुसरता, जे तुम्ही परमेश्वरास शोधता, ते तुम्ही माझे ऐका! ज्या खडकातून तुम्हास खोदून काढले आहे, आणि ज्या खाचेच्या खळग्यातून तुम्हास खणून बाहेर काढले आहे, त्याच्याकडे तुम्ही पाहावे.

कारण नियमशास्त्रामुळे जे आहेत ते वारीस झाले तर विश्वास निरर्थक आणि वचन निरुपयोगी केले गेले.

कारण त्यांच्याविषयी मी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी ईर्ष्या आहे, पण ती ज्ञानामुळे नाही.

¶ कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके शापाच्या अधीन आहे कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व पाळण्यास जो टिकून राहत नाही तो शापित आहे.’

कारण सुंता झालेल्या प्रत्येक मनुष्यास मी हे पुन्हा निक्षून सांगतो की, तो संपूर्ण नियमशास्त्र पाळण्यास बांधलेला आहे.

कारण कोणीही मनुष्य संपूर्ण नियमशास्त्र पाळतो आणि एखाद्या नियमाविषयी अडखळतो, तरी तो सर्वांविषयी दोषी ठरतो.