मी बोलावले पण तुम्ही ऐकायला नकार दिला; मी आपला हात पुढे केला, पण कोणीही लक्ष दिले नाही.
TSK
TSK · जख 7:13
مراجع Treasury of Scripture Knowledge في मराठी IRV.
जर एखाद्याने आपला कान नियम ऐकण्यापासून दूर फिरवला, त्याची प्रार्थनासुद्धा वीट आणणारी होईल.
मी आलो पण तेथे कोणीच नव्हते का? मी हाक मारली पण कोणीच उत्तर दिले नाही का? माझा हात तुझी खंडणी देण्यास तोकडा होता? माझ्यात तुला सोडवण्याचे सामर्थ्य नाही का? पाहा, मी आपल्या धमकीने समुद्र कोरडा करतो; मी नद्यांचे वाळवंट करतो; त्यांचे मासे पाण्या अभावी मरतात आणि सडतात.
म्हणून परमेश्वर म्हणतो, मी त्यांना भयंकर संकटात टाकीन, ज्यातून त्यांना सुटका करून घेता येणार नाही. तेव्हा ते मदतीसाठी माझा धावा करतील, पण मी त्यांचे ऐकणार नाही.
मानवाच्या मुला, या सर्व मानवांनी मूर्तींची उपासना केली व मनात त्यांना जागा दिली, त्यांनी आपल्या दृष्टी समोर पापाला अडखळण ठेवले आहे, अशा पापीष्ट लोकांस मी आपल्याला प्रश्न विचारु देईन?
आता, तुम्ही अधिकारी कदाचित परमेश्वराची प्रार्थना कराल. पण तो तुम्हास उत्तर देणार नाही. त्या वेळेस तो आपले तोंड तुमच्यापासून लपवेल. कारण तुम्ही दुष्कृत्ये केली आहेत.”
‹घराच्या मालकाने उठून दरवाजा बंद केल्यावर, तुम्ही बाहेर उभे रहाल व दरवाजा ठोठवाल आणि म्हणाला; प्रभू, आम्हासाठी दरवाजा उघडा! परंतु तो तुम्हास उत्तर देईल, तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही.›
‹“कोणत्या गोष्टी तुला शांती देतील ते जर आज तू जाणून घेतले असते तर! परंतु आता त्या तुझ्या नजरेपासून लपवून ठेवण्यात आल्या आहेत.›