TSK

TSK · 2 राजे 21:11

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

मग चार पिढ्यानंतर तुझे लोक या देशात माघारे येतील. कारण अमोरी लोकांचा अन्याय अद्याप त्याच्या मर्यादेपर्यंत पोहोचलेला नाही.”

राजा यराबामाने बरीच पापे केली होती, तसेच इस्राएल लोकांसही ती करायला लावली म्हणून हे घडले. इस्राएलचा परमेश्वर देव याचा यराबामावर कोप झाला

अहाबाने आणखी एक पातक केले ते म्हणजे अमंगळ मूर्तींची पूजा केली. अमोरी लोकांनीही हेच केले तेव्हा परमेश्वराने त्यांच्याकडून हा प्रदेश काढून घेऊन इस्राएल लोकांस दिला.

पण लोकांनी परमेश्वराचे ऐकले नाही. इस्राएल लोक इथे येण्यापूर्वी कनानमधील राष्ट्रांनी जी वाईट वर्तणूक केली त्यापेक्षाही मनश्शेचे वर्तन निंद्य होते. इस्राएल लोक या भूमीत आले तेव्हा त्या राष्ट्रांना परमेश्वराने नष्ट केले होते.

तो आपल्या वडिलांसारखाच होता. वडिलांनी ज्या देवतांची पूजाअर्चा केली त्यांचीच पूजा आमोननेही आरंभली.

यहूदा आपल्या नजरेसमोरुन नाहीसा व्हावा म्हणून परमेश्वराच्या आज्ञेने हे झाले. मनश्शेची पापे याला कारणीभूत होती.

पृथ्वीवरच्या सर्व राज्यांत मी त्यांना भयंकर गोष्ट असे करीन, मनश्शेने, हिज्कीयाचा मुलगा, यहूदाचा राजा, याने जे यरूशलेममध्ये केले, या कारणास्तव मी असे करीण.

असे जाहीर कर परमेश्वर देव यरूशलेमेला असे म्हणतो, तुझी सुरुवात आणि जन्म सुध्दा कनान देशात झाला आहे, तुझा बाप आमोरी आणि आई हित्ती होती.