TSK

TSK · 2 शमु 21:7

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

मग योनाथानाने दावीदाशी मैत्रीचा करार केला कारण तो आपल्या जिवासारखी त्याजवर प्रीती करीत होता.

तर तू आपली कृपा माझ्या घराण्यावरून कधीही काढू नको; परमेश्वर दावीदाचा प्रत्येक शत्रू भूमीच्या पाठीवरून छेदून टाकील तेव्हाही ती काढू नको;

योनाथान दावीदाला म्हणाला, “शांतीने जा; कारण आपण दोघांनी परमेश्वराच्या नावाने शपथ वाहून म्हटले आहे की माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये आणि माझ्या संतानामध्ये व तुझ्या संतानामध्ये परमेश्वर साक्षी सर्वकाळ असो” मग तो उठून निघून गेला व योनाथान नगरात गेला.

तेव्हा दावीदाने शौलाशी शपथ वाहिली. मग शौल घरी गेला आणि दावीद व त्याची माणसे गडावर चढून गेली.

¶ दावीदाने विचारले, “शौलाच्या घराण्यातील कोणी व्यक्ती अजून राहिली आहे का?” योनाथानासाठी मला तिच्यावर दया दाखवली पाहिजे.

त्यास दावीद म्हणाला, भिऊ नको; तुझे वडील योनाथान यासाठी मी तुझ्यावर अवश्य दया करीन. तुझ्या वडीलासाठी मी एवढे करीन, तुझे आजोबा शौल यांची सर्व जमीन मी तुला परत देईन आणि तू नेहमी माझ्या पंक्तीला भोजन करावे.

तेव्हा राजा सीबाला म्हणाला ठीक आहे, जे जे मफीबोशेथच्या मालकीचे होते ते मी आता तुला देत आहे. सीबा म्हणाला, मी आपल्याला नमन करतो. मी तुम्हास आनंद देण्यास समर्थ होईन अशी मी आशा करतो.