TSK

TSK · 2 शमु 7:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

राजसत्ता तुझ्याच वंशात चालू राहील याचा विश्वास बाळग. तुझे राज्य अबाधित राहील. तुझे राजासन टिकून राहील.”

तू परमेश्वराचे म्हणणे ऐकल्याने तो ही मला दिलेली वचने पाळील, जर मी सांगितलेल्या मार्गाने मनापासून आणि प्रामाणिकपणाने, तुझे पुत्र चालले, तर इस्राएलाच्या राजासनावरून तुझ्या वंशातला पुरुष खुंटणार नाही.

“माझ्या सर्व आज्ञा आणि नियम तू पाळलेस तर तुझे वडिल दावीद यांना कबूल केले ते सर्व मी तुझ्यासाठी करीन.

पण परमेश्वराने आपला सेवक दावीद याला वचन दिलेले असल्यामुळे परमेश्वराने यहूद्यांचा नाश केला नाही. दाविदाच्या वंशातीलच कोणीतरी सतत गादीवर येईल असे वचन परमेश्वराने दाविदाला दिले होते.

मनश्शेने अशेराचा कोरीव पुतळा करून तो मंदिरात ठेवला. या मंदिराविषयी दावीद आणि दाविदाचा मुलगा शलमोन यांना परमेश्वर म्हणाला होता, “इस्राएलमधील सर्व वंशातून, या नगरांमधून मी यरूशलेमची निवड केली आहे. यरूशलेममधील मंदिरात मी माझे नाव कायमचे ठेवीन.

¶ मात्र तुला पुत्र होईल तो शांतीप्रिय मनुष्य असेल. मी त्यास त्याच्या सर्व शत्रूपासून प्रत्येक बाजूने विसावा देईन. कारण त्याचे नाव शलमोन असे होईल आणि इस्राएलांस त्याच्या दिवसात मी शांतता आणि स्वस्थता देईन.

परमेश्वराने त्याचे पवित्रस्थानासाठी मंदिर बांधण्यासाठी तुझी निवड केली आहे हे लक्षात ठेव. बलवान हो आणि हे कर.”

जे लोक योग्य रीतीने वागतात त्यांच्यावर देव नजर ठेवतो. तो चांगल्या लोकांस राज्य करु देतो. तो चांगल्यांना सदैव उंच करतो.

मी तुझ्या वंशाजांची स्थापना सर्वकाळ करीन, आणि तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थापिन.

त्याचे वंश सर्वकाळ राहील, आणि त्याचे राजासन आकाशाप्रमाणे टिकेल.

कारण आम्हासाठी बाळ जन्मले आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; आणि त्याच्या खाद्यांवर सत्ता राहिल; आणि त्यास अद्भूत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा राजा असे म्हणतील.

परमेश्वर असे म्हणतो, योग्य वेळेला मी माझी दया दाखवीन, मी तुला उत्तर देईल, आणि तारणाच्या दिवशी मी तुला मदत करेन. मी तुझे रक्षण करेन आणि तुला लोकांचा करार असा देईन. देश पुन्हा बांधायला आणि ओसाड वतन करून घ्यायला,

जो देश माझा सेवक याकोब याला मी दिला, जेथे तुमचे पूर्वज राहत होते. त्यामध्ये ते वस्ती करतील, तेथे ते व त्यांची मुले, व त्यांची नातवंडे सर्वकाळ तेथे राहतील. दावीद हा माझा सेवक त्यांचा सर्वकाळचा अधिपती होईन.

मग त्यास पुढील गोष्टी सांग: “सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो: ‘फांदी’ नावाचा एक मनुष्य आहे. तो आपल्या स्थानावर उगवेल व तो परमेश्वराचे मंदिर बांधील.

‹आणखी मी तुला असे सांगतो की, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्यापुढे मृतलोकाच्या द्वारांचे कांहींच चालणार नाही.›

ज्याप्रमाणे घरापेक्षा घर बांधणाऱ्याला अधिक सन्मान असतो, त्याप्रमाणे येशू हा मोशेपेक्षा अधिक सन्मानास पात्र गणला गेला.