TSK

TSK · प्रेषि 2:37

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

त्यांच्यातील काही जण बचावले जातील आणि पर्वतावर कबूतराप्रमाणे जातील, त्यांच्या पातकामुळे ते कण्हत राहतील.

¶ नंतर जमावातील लोकांनी त्यास विचारले, “आता आम्ही काय करावे?”

काही शिपायांनीसुद्धा त्यास विचारून म्हटले, “आणि आमच्या बद्दल काय, आम्ही काय करावे?” तो त्यांना म्हणाला, “कोणाकडून जबरदस्तीने पैसे घेऊ नका, कोणावरही खोटा आरोप करू नका, तुम्हास मिळणाऱ्या पगारात समाधानी राहा.”

‹आणि तो आल्यावर तो जगाची पापाविषयी, नीतिमत्त्वाविषयी आणि न्यायाविषयी खात्री करील.›

¶ हे ऐकून ते चिडून गेले आणि त्यांना जिवे मारण्याचा विचार करू लागले.

शौल म्हणाला, “प्रभू तू कोण आहेस?” ती वाणी म्हणाली, ‹“मी येशू आहे, ज्याचा तू छळ करीत आहेस तो मीच आहे;›

मग मी म्हणालो, प्रभूजी मी काय करावे? प्रभूने मला म्हटले, ‹“उठून दिमिष्कात जा; मग तू जे काही करावे म्हणून ठरविण्यात आले आहे, त्या सर्वांविषयी तुला तेथे सांगण्यात येईल.”›

कारण मी एकदा नियमशास्त्राशिवाय जगत होतो, पण जेव्हा आज्ञा आली तेव्हा पाप सजीव झाले व मी मरण पावलो.

¶ कारण देवाचे वचन सजीव, सक्रीय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा अधिक धारदार असून जीव, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांची पारख करणारे असे आहे.