TSK

TSK · दानि 11:31

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

परमेश्वराने आपल्या वेदीचा त्याग केला आहे; त्याने आपल्या पवित्रस्थानाचा वीट मानला आहे. त्याने तिच्या राजवाड्याच्या भिंती शत्रूच्या हाती दिल्या आहेत. परमेश्वराच्या मंदिरात शत्रूने जयघोष केला. सणाचा दिवस असल्याप्रमाणे त्यांनी गोंगाट केला.

तो त्यांना म्हणाला, “आक्रमण करा, मंदिर भ्रष्ट करा, घरे उध्वस्त करा, आणि वेशी मृतांना व्यापून टाका” मग ते यरुशमेल नगराच्या बाहेर जाऊन हल्ला करतील.

¶ आणि त्याने आपणाला त्या सैन्याच्या अधिपतीबरोबर मोठ केले, आणि त्याचे नित्याचे होमार्पण बंद केले, व त्याच्या पवित्रस्थानाची जागा पाडून टाकली.

¶ त्याची सत्ता महान होईल पण ती त्याच्या स्वबळाने नाही तो दूरपर्यंत पोहचणारा विनाश करील तो जे काही करील त्यामध्ये त्याचा विकास होईल तो पवित्र व बलवानांचा नाश करील.

¶ एक सप्तकाचा करार तो पुष्कळासोबत पक्का करेल, सप्तकाच्या मध्यात तो यज्ञ आणि अर्पणे बंद करील. नाश करणारा अमंगळाच्या पंखावर स्वार होऊन येईल. संपूर्ण नाश आणि अंत ठरलेला आहे. नाश करणाऱ्यावर त्याचा वर्षाव करण्यात येईल.”

¶ ‹तर दानीएल संदेष्ट्याने सांगितले होते, ओसाड करणारी अमंगळ गोष्ट, पवित्र जागी परमेश्वराच्या भवनामध्ये उभी असलेली तुम्ही पाहाल.”› (वाचकाने हे ध्यानात घ्यावे.)

¶ ‹तुम्ही जेव्हा यरूशलेम शहरास सैन्यानी वेढा घातलेला पाहाल, तेव्हा तुम्हास कळून येईल की, तिचा नाश होण्याची वेळ आली आहे.›

आणि तू बघितलीस ती दहा शिंगे दहा राजे आहेत. त्यांना अजून राज्य मिळाले नाही; पण त्यांना त्या पशूबरोबर, एक घटका राजांसारखा अधिकार मिळतो.