TSK

TSK · दानि 8:25

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

¶ “त्याला बेहोश करा, कारण त्याने परमेश्वराविरूद्ध गर्वाने कृती केली आहे. आता मवाब स्वत:च्याच वांतीत हाताने टाळ्या वाजविल, म्हणून तोही हास्यविषय होईल.

¶ तुम्ही वर पाहत होता तेव्हा कोणा मनुष्याचा हात लागल्यावाचून एक दगड छेदला गेला आणि त्याने त्या पुतळ्याच्या लोखंडाच्या व मातीच्या पावलांवर आदळून त्यांचे तुकडे तुकडे केले.

¶ मी ती शिंगे पाहत असतांना, मग त्यांच्यातून आणखी लहान शिंगे निघाले आणि आधिच्या शिंगातून तीन मुळासह उपटली गेली मी पाहिले त्या शिंगास मानवासारखे डोळे होते आणि मोठ्या फुशारक्या मारणारे तोंड होते.

¶ आणि त्याने आपणाला त्या सैन्याच्या अधिपतीबरोबर मोठ केले, आणि त्याचे नित्याचे होमार्पण बंद केले, व त्याच्या पवित्रस्थानाची जागा पाडून टाकली.

जेव्हा सैन्य पुढे चालत राहील, तेव्हा दक्षिणेच्या राजाचे मन गर्वाने भरुन जाईल तो त्याच्या लाखो शत्रूंचा नाश करील तरी तो यशस्वी होणार नाही.

जे कराराविषयी दुष्टपण करतात त्यास तो फुस लावील, पण जे लोक आपल्या देवाला जाणतात ते बलवान होऊन मोठे काम करतील.

तो आपला शाही तंबू समुद्राच्या आणि पवित्र पर्वताच्या दरम्यान ठोकील. तो त्याच्या शेवटास येईल. पण कोणी त्यास मदत करणार नाही.

ते कोकऱ्याशी युद्ध करतील आणि कोकरा त्यांना जिंकील कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे; आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते बोलावलेले, निवडलेले आणि विश्वासू आहेत.”

¶ आणि मी बघितले की, तो जो घोड्यावर बसला होता त्याच्याबरोबर आणि त्याच्या सेनेबरोबर लढाई करायला तो पशू व पृथ्वीचे राजे आणि त्यांच्या सेना एकत्र आल्या होत्या.