TSK

TSK · अनु 5:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

म्हणून मी आता तुम्हास सांगतो की तुम्ही माझी वाणी खरोखर ऐकाल आणि माझ्या कराराचे पालन कराल, तर सर्व लोकांमध्ये माझा खास निधी व्हाल. सर्व पृथ्वी माझी आहे.

¶ मग परमेश्वर म्हणाला, “पाहा, मी तुझ्या सर्व लोकांबरोबर हा करार करीत आहे; आतापर्यंत पृथ्वीवरील कोणत्याही राष्ट्रासाठी यापूर्वी कधीही केलेले नाहीत ते चमत्कार मी करीन; ज्या लोकांमध्ये तू राहशील ते सर्व लोक परमेश्वराची कृती पाहतील, कारण जे मी तुझ्याबरोबर करणार आहे ते भयानक आहे.

परमेश्वराने आपला करार करून तुम्हास सांगितले. त्याने तुम्हास दहा आज्ञा सांगितल्या व त्यांचे पालन करण्याविषयी तुम्हास आज्ञा दिली. त्याने त्या आज्ञा दोन दगडी पाट्यांवर लिहून दिल्या.

परमेश्वराने इस्राएल लोकांशी करार करून त्यांना आज्ञा केली होती की, “इतर दैवतांचे भय तुम्ही धरू नका, आणि त्यांच्या पाया ही पडू नका व त्यांची सेवाही करू नका व त्यांना यज्ञ करू नका.

परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, “जेव्हा मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून दास्याच्या घरातून बाहेर आणले तेव्हा मी त्यांच्याशी करार केला. तो म्हणजे,

कारण नियमशास्त्राची प्रत्येक आज्ञा सर्व लोकांसमोर जाहीर केल्यानंतर मोशेने पाण्याबरोबर वासराचे व बकऱ्याचे रक्त तसेच किरमिजी लोकर आणि एजोबाच्या फांद्या हे सर्व बरोबर घेतले; आणि ते त्याने नियमशास्त्राच्या पुस्तकावर आणि सर्व लोकांवर शिंपडले.