TSK

TSK · उत्प 17:5

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

तेव्हा तो पुरुष म्हणाला, “तुझे नाव याकोब असणार नाही. येथून पुढे तुझे नाव इस्राएल असेल. कारण तू देवाशी व मनुष्यांशी झगडून विजय मिळवला आहेस.”

मोशेने देश हेरावयास पाठवलेल्या लोकांची ही नांवे होती. (मोशेने नूनाचा मुलगा होशा ह्याचे नांव यहोशवा असे ठेवले.)

अब्राम म्हणजेच अब्राहाम.

मग राष्ट्रे तुझा चांगुलपणा पाहतील सर्व राजे तुझी प्रतिष्ठा पाहतील. परमेश्वर तुला जे नवे नाव देईल, त्या नावाने तुला हाक मारतील.

दुसऱ्या दिवशी पशहूरने यिर्मयाला खोड्यातून मोकळे केले, तेव्हा यिर्मया पशहूरला म्हणाला, “तुझे परमेश्वराने ठेवलेले नाव पशहूर नाही, तर मागोर मिस्साबीब (प्रत्येक बाजूला भय) असे आहे.

ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, तो आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारील.”

कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले आहे.’ ज्याच्यावर त्याने विश्वास ठेवला, जो मरण पावलेल्यांना जिवंत करतो आणि अस्तित्वात नसलेल्यांना ते असल्याप्रमाणे बोलावतो त्या देवाच्या दृष्टीपुढे तो असा आहे.