TSK

TSK · उत्प 2:9

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

परंतु बागेच्या मधोमध जे झाड आहे, त्याच्या फळाविषयी देवाने म्हटले, ते खाऊ नका. त्या झाडाला स्पर्शही करू नका, नाहीतर तुम्ही मराल.”

¶ परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, मनुष्य आपल्यातल्या एका सारखा होऊन त्यास बरे व वाईट समजू लागले आहे. तर आता त्यास त्याच्या हातांनी जीवनाच्या झाडावरून ते फळ घेऊन खाऊ देऊ नये, आणि जर का तो ते फळ खाईल तर मग सदासर्वकाळ तो जिवंत राहील.”

जे कोणी तिला धरून राहतात त्यांना ती जीवनाचे वृक्ष आहे, जो कोणी ते धरून ठेवतो तो सुखी आहे.

व्यर्थ बोलणाऱ्याचे शकून मी निष्फळ करतो आणि जे शकून वाचतात त्यांना काळिमा लावतो; जो मी ज्ञानाचे ज्ञान मागे फिरवतो आणि त्यांचे सल्ले मूर्खपण करतो.

देवाच्या बागेतील, देवदारूने त्यास झाकून टाकिता येईना! सुरूच्या झाडामधील फांद्या त्याच्या तोडीच्या नव्हत्या व अर्मोन झाडे त्याच्या मुख्य फांद्याची बरोबरी करू न शकणाऱ्या होत्या. देवाच्या बागेतील कोणतेच झाड सुंदरतेत त्याच्यासारखे नव्हते.

तू वैभवाने व मोठेपणाने एदेनेमधल्या झाडांपैकी कोणाच्या तोडीचा आहेस? तुला तर एदेनांतल्या झाडांसह अधोलोकी लोटतील आणि तलवारीने ठार झालेल्यांसह बेसुंत्यांमध्ये तू पडून राहशील. फारो व त्याचा लोकसमुदाय यांची अशी गति होईल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”

‹मीच जीवनाची भाकर आहे.›

‹आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको! जो विजय मिळवतो त्यास देवाच्या बागेतल्या जीवनाच्या झाडाचे फळ खाण्याचा अधिकार देईन.›

‹आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले झगे धुतात ते धन्य आहेत.›