TSK

TSK · उत्प 21:15

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

¶ मोशे इस्राएल लोकांस तांबड्या समुद्रापासून पुढे घेऊन गेला. ते लोक शूरच्या रानात गेले; त्यांनी तीन दिवस रानातून प्रवास केला; पण त्यांना पाणी कोठे मिळाले नाही.

¶ मग इस्राएलचा राजा, यहूदा आणि अदोमाच्या राजाबरोबर चालत सात दिवसाच्या वाटेचा फेरा केल्यावर, तिथे त्यांच्या सैन्याला, घोड्यांना, तसेच त्यांच्याबरोबरची जनावरे याकरिता पाणी सापडले नाही.

लोहार त्याच्या हत्याराने, निखाऱ्यांवर काम करून, घडवत असतो. तो त्यास हातोड्याने आकार देतो आणि आपल्या बळकट बाहूने काम करतो. तो भुकेला होतो आणि त्याची शक्ती जाते. तो पाणी पीत नाही आणि क्षीण होतो.