TSK

TSK · उत्प 22:1

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

त्याच्या मुलामुळे या गोष्टीचे अब्राहामाला फार दुःख झाले.

परंतु तेवढ्यात, परमेश्वराच्या दूताने स्वर्गातून हाक मारून त्यास म्हटले, “अब्राहामा, अब्राहामा!” अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे.”

रात्री देव स्वप्नात दर्शन देऊन इस्राएलाशी बोलला, तो म्हणाला, “याकोबा, याकोबा.” त्याने उत्तर दिले, “काय आज्ञा?”

मोशेने परमेश्वराचा धावा केला तेव्हा परमेश्वराने त्यास एक वनस्पती दाखवली. ती त्याने पाण्यात टाकल्यावर तेव्हा ते पाणी गोड झाले. त्या वेळी परमेश्वराने इस्राएल लोकांस विधी व नियम लावून दिला; तसेच त्याने त्यांचा विश्वासाची कसोटी घेतली.

तसेच गेली चाळीस वर्षे आपल्या परमेश्वर देवाने तुम्हास रानावनातून कसे चालवले, त्या प्रवासाची आठवण ठेवा. परमेश्वर तुमची परीक्षा पाहत होता. तुम्हास नम्र करावे, तुमच्या अंत:करणातील गोष्टी जाणून घ्याव्या, तुम्ही त्याच्या आज्ञा पाळता की नाही ते बघावे म्हणून त्याने हे केले.

तरी त्या संदेष्टयाचे किंवा स्वप्न पाहणाऱ्याचे ऐकू नका. कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्यांच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने प्रीती करता कि नाही हे पाहण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमची परीक्षा पाहत असेल.

परमेश्वराने शमुवेलाला हाक मारली, तेव्हा तो म्हणाला, “मी येथे आहे.”

एकदा देशात घडलेल्या चमत्कारांविषयी चौकशी करायला बाबेलच्या अधिपतींनी त्याच्याकडे राजदूत पाठवले. तेव्हा हिज्कीयाची पारख करावी आणि त्याचे मन जाणून घ्यावे म्हणून देवाने त्यास एकटे सोडले.

¶ मी प्रभूची वाणी बोलताना ऐकली ती अशी, “मी कोणाला पाठवू; आमच्यासाठी कोण जाईल?” मग मी म्हणालो, “मी येथे आहे; मला पाठव.”

¶ अब्राहामाने, त्याची परीक्षा केली जात असता विश्वासाने, इसहाकाचे अर्पण केले; म्हणजे, ज्याने वचने स्वीकारली होती तो आपला एकुलता एक मुलगा अर्पिला.

आपला पूर्वज अब्राहाम ह्याने आपला मुलगा इसहाक ह्याला जेव्हा यज्ञवेदीवर अर्पण केले, तेव्हा तो कृतीनी नीतिमान ठरला नव्हता काय?