TSK

TSK · उत्प 41:38

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

¶ एज्रा देवाने जे ज्ञान तुला दिले त्याच्यायोगे तू शास्ते व धार्मिक आणि न्यायाधीश यांची नेमणूक कर. तुझ्या देवाचे नियम जाणणाऱ्या नदीच्या पलीकडील लोकांचे ते न्यायाधीश होतील. आणि ज्यांना देवाचे नियम माहीत नाहीत अशांना ते शिकवतील.

शहाणपणाने वागणाऱ्या सेवकावर राजाची मर्जी असते, पण जो लज्जास्पद कृत्य करतो त्याच्यासाठी त्याचा राग आहे.

म्हणून मी आज्ञा केली की, बाबेलातील सर्व ज्ञानी लोकांस मजकडे आणावे म्हणजे ते माझ्या स्वप्नाचा उलघडा करतील.

हे स्वप्न मी नबुखद्नेस्सर राजाने पाहिले आता तू हे बेल्टशस्सरा ह्याचा अर्थ मला सांग कारण माझ्या राज्यातल्या ज्ञानी जनांपैकी कोणीही ह्याचा अर्थ सांगू शकत नाही, पण तू हे सांगू शकतोस, कारण देवाचा पवित्र आत्मा तुझ्याठायी राहतो.

मी तुझ्याविषयी ऐकले आहे, की देवाचा आत्मा तुझ्यात राहतो आणि प्रकाश, विवेक व उत्तम ज्ञान हे तुझ्या ठायी दिसून आले आहे.

¶ असे असताना इतर मुख्य प्रशासक आणि प्रांतिधिकारी हे दानीएलात चूक शोधण्याचा प्रयत्न करत होते. पण तो विश्वासू असल्याने त्यांना त्याच्यात काहीच चूक सापडली नाही.