TSK

TSK · होशे 4:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

तेव्हा आता ही तलवार तुझ्या कुटुंबाचा पिच्छा सोडणार नाही. तू उरीया हित्तीच्या पत्नीचे हरण केलेस. तुला माझी पर्वा नाही हेच यातून दिसते.

परमेश्वराच्या मंदिरातील पुरुष वेश्यांची घरे योशीयाने उद्ध्वस्त केली. बायकाही या घरांचा वापर करत आणि अशेरा या देवतेच्या सन्मानार्थ लहान तंबू आच्छादने तयार करत असत.

“तुम्हास पवित्र वाटणाऱ्या एलाच्या झाडाची तुम्हास लाज वाटेल, आणि तुम्ही निवडलेल्या बागा तुम्हास लज्जास्पद होतील.

तू तुझे अंथरूण उंच पर्वतावर तयार केले आहे, तेथेच तू यज्ञ अर्पण करायला वर गेलीस.

नंतर योशीया राजाच्या दिवसात परमेश्वर माझ्याशी बोलला. परमेश्वर म्हणाला, इस्राएल माझ्या बाबतीत कसा अविश्वासू आहे, हे तू पाहिलेस का? एका व्यभिचारीणी प्रमाणे तिने प्रत्येक टेकडीवर आणि प्रत्येक हिरव्या झाडाखाली व्यभिचार केला.

मग तुम्हास समजेल मी परमेश्वर देव आहे, जेव्हा त्यांचे मस्तक त्यांच्या वेद्यांपुढे उच्च ठिकाणी ओक झाडा शेजारी, हिरव्या छाये खाली पडलेले असतील, जेथे ते मुर्त्यांना सुगंधी द्रव्य अर्पण करीत होते!

तू पवित्र ठिकाण आपल्यासाठी प्रत्येक रस्त्यावर उभे केले आणि तुझे सौंदर्य जाहीर केले, तू आपले पाय पसरुन आपल्या मना प्रमाणे वेश्या कर्म केले.

तिने बआलास धूप दिला, आणि नथ व दागिने घालून स्वत: नटली. मला विसरून आपल्या प्रियकरांमागे गेली म्हणून मी तिला शिक्षा करीन असे परमेश्वर म्हणतो.

पण परमेश्वर असे म्हणतो, ‘तुझी पत्नी गावची वेश्या होईल; तुझी मुले-मुली तलवारीने मरतील, तुझी भूमी सूत्राने विभागीत करण्यात येईल, तू अपवित्र जागी मरशील, इस्राएलाच्या लोकांस निश्चितच त्यांच्या देशातून कैदी म्हणून नेले जाईल.’”