TSK

TSK · होशे 8:9

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

अश्शूरचा राजा पूल देशावर आला. तेव्हा पूलने आपल्याला पाठिंबा द्यावा आणि आपले राज्य बळकट करावे, या इराद्याने मनहेमने पूलला हजार किक्कार चांदी दिली.

ते फारोकडे संरक्षण मागण्याकरिता आणि त्याच्या छायेत आश्रय घेण्याकरता मला न विचारता मिसरकडे खाली उतरून जातात.

जी जंगलात राहायला सवकलेली रानगाढवी स्वेच्छाधीन असता वारा हुंगते तशी तू आहेस. ती माजावर असताना कोण तिला परतवील? जे तिला शोधतात ते आपणास श्रम देणार नाहीत. तिच्या ऋतूत ती त्यांना सापडेल.

¶ परंतू अहला जेव्हा ती माझी होती तेव्हापासून तिने वेश्या कर्म केले; तिच्या प्रियकरांशी ती वासनेने कामसक्त झाली होती, अश्शूरांच्या हाती ते सत्ता असलेले होते.

नंतर मी तिच्या प्रियकरांसमोर तिला नग्न करीन व त्यापैकी कोणीही तिला माझ्या हातून सोडवू शकणार नाही.

एफ्राईम कबुतरा सारखा भोळा व भावनाहीन आहे, तो मिसराला हाक मारतो, नंतर अश्शूरास उडून जातो.

परमेश्वराचा वाद यहूदाशी आहे. आणि तो याकोबास त्याच्या कृत्याचे शासन करील. त्यांचे प्रतिफळ त्यास मिळेल.