TSK

TSK · यश 21:1

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

दक्षिणेकडून चक्रीवादळ येते उत्तरेकडून थंड वारे येतात.

अनेक लोकांच्या समुदायाच्या गोंगाटाप्रमाणे, अनेक राष्ट्रांच्या राजाच्या एकत्र जमल्याप्रमाणे डोंगरात गलबला होत आहे. सेनाधीश परमेश्वर लढाईसाठी फौज तयार करत आहे.

पाहा, मी त्यांच्याविरुद्ध माद्य लोकांस हल्ला करण्यासाठी उठवीन, ते रुप्याबद्दल पर्वा करणार नाहीत किंवा ते सोन्याने आनंदीत होणार नाही.

¶ परमेश्वर याकोबावर दया करील; तो इस्राएलाची पुन्हा निवड करील आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या देशात स्थापील. परके त्यांच्यात सहभागी होतील आणि ते स्वतः याकोबाच्या घराण्याला जडून राहतील.

मी तिला घुबडाची मालमत्ता व पाण्याचे तळे असेही करीन, आणि मी तिला नाशाच्या झाडूने झाडून टाकीन, असे सेनाधीश परमेश्वर जाहीर करतो.

बाबेलाच्या कुमारी कन्ये, खाली ये आणि धुळीत बस; खास्द्यांच्या कन्ये, सिंहासनाशिवाय जमिनीवर बस. तुला यापुढे सुंदर आणि नाजूक म्हणणार नाहीत.

बाबेलावर समुद्र आला आहे! ती त्याच्या गरजणाऱ्या लाटांनी झाकली आहे.

तो व त्याच्याबरोबर त्याची सेना, राष्ट्राची दहशत, देशाचा नाश करण्यासाठी आणण्यात येईल; ते मिसराविरूद्ध आपल्या तलवारी काढतील व देश मरण पावलेल्या लोकांनी भरुन टाकतील.

¶ शेवटच्या वेळी दक्षिणेचा राजा हल्ला करील. उत्तरेचा राजा त्याकडे रथ, स्वार आणि अनेक जहाजे घेऊन वाऱ्यासारखा येईल. तो अनेक राज्यावर हल्ला करून त्यांना पुरासारखे पुसून टाकील.