TSK

TSK · यश 28:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

त्यांचे मेज त्यांच्यापुढे पाश होवोत; जेव्हा ते सुरक्षित आहेत असा विचार करतील, तो त्यांना सापळा होवो.

त्यांनी डोळ्यांनी पाहू नये किंवा कानांनी ऐकू नये आणि त्याच्या हृदयाने समजू नये, आणि मग पुन्हा वळू नये व बरे होऊ नये म्हणून या लोकांचे हृदय कठीण कर, आणि त्यांचे कान बहीरे, आणि डोळे आंधळे कर.”

पुष्कळ लोक त्यावर ठेचा खातील, पडतील व फुटतील, पाशांत अडकून पकडल्या जातील.”

पण तुम्ही कधीही परमेश्वराच्या ओझ्याची आठवण करुच नका, कारण प्रत्येकाला आपापलेच वचन ओझे असे होईल, कारण जिवंत देव, सेनाधीश परमेश्वर, आमचा देव याची वचने तुम्ही विपरीत केली आहेत.

मी असंख्य वेळा माझे नियमशास्त्र त्यांच्यासाठी लिहीले, पण ते त्याकडे अनोळख्या सारखे पाहतात.

‹जो कोणी या दगडावर पडेल, त्याचे तुकडे तुकडे होतील परंतु जर हा दगड कोणावर पडेल तर त्याचा भुगाभुगा होईल.”›

ज्या लोकांचा नाश होत आहे, मृत्युचा मरणसूचक वास आणि जे तारले गेले आहेत, जीवनाकडे नेणारा जीवनाचा वास आहोत आणि या गोष्टींसाठी कोण लायक आहे?

आणि त्याने आपल्या सर्व पत्रांत या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये समजण्यास कठिण अशा काही गोष्टी आहेत आणि जे अशिक्षित व अस्थिर माणसे इतर शास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसा ह्यांचाहि करतात; अशाने आपल्या स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात.