TSK

TSK · यश 28:21

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

या नियमशास्त्राच्या ग्रंथातील करारात लिहिलेला आहे. त्यातल्या सर्व शापाप्रमाणे परमेश्वर त्यांच्या वाइटासाठी त्यास इस्राएलाच्या सर्व वंशातून घालवून देईल.

ते इस्राएलापुढून बेथ-होरोनाच्या उतरणीवरून पळून जात असताना परमेश्वराने अजेकापर्यंत आकाशातून त्यांच्यावर गारांचे मोठे दगड फेकल्यामुळे ते ठार झाले. इस्राएल लोकांनी तलवारीने मारले त्यांपेक्षा जास्त लोक गारांच्या दगडांनी मरण पावले.

तेव्हा दावीद बाल-परासीम येथे गेला आणि त्याने पलिष्ट्यांचा पराभव केला. दावीद तेव्हा म्हणाला, “खिंडार पडलेल्या धरणातून पाणी घूसावे तसा परमेश्वर माझ्यादेखत शत्रूवर तुटून पडला.” म्हणूनच दावीदाने त्या जागेचे नाव बाल परासीम म्हणजे, खिंडार पाडणारा प्रभू, असे ठेवले.

मग दावीद आणि त्याची माणसे बालपरासीम येथपर्यंत जाऊन पोचली आणि तेथे त्यांने त्यांचा पराभव केला. तो म्हणाला, “देव पुराच्या पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या हाताने माझ्या शत्रूवर तुटून पडला आहे.” त्याठिकाणाचे नाव बाल-परासीम असे पडले आहे.

सीयोन डोंगर व यरूशलेम यासंबंधीचे आपले कार्य संपले तेव्हा प्रभू म्हणेल, अश्शूरच्या राजाच्या उन्मत्त हृदयाचे भाषण व त्याच्या गर्वीष्ठ दृष्टीला मी शिक्षा करीन.

म्हणून मी शक्तीशाली व चमत्कारिक गोष्टी करून या लोकांस विस्मित करीत राहीन. आश्चर्या मागून आश्चर्य, त्यांच्यातील सुज्ञ मनुष्याचे ज्ञान नष्ट होईल, आणि त्यांच्यातील शहाण्या मनुष्याचा समजदारपणा नाहीसा होईल.

जसा अग्नी काड्या पेटवतो, जसा अग्नी पाणी उकळवतो तसा तू आपल्या शत्रूंस आपले नाव कळवायला राष्ट्रे तुझ्यापुढे थरथर कापावीत म्हणून तू खाली उतरून आला असता तर किती बरे झाले असते!

रस्त्याच्या बाजूने जाणारे सुध्दा तुझ्याकडे पाहून टाळ्या वाजवतात. यरूशलेमेच्या कन्येकडे पाहून ते शिळ घालतात आणि आपल्या मस्तकाने इशारा करून म्हणतात, “हिच ती नगरी आहे का जिला ‘सौंदर्यपूर्ण’ किंवा ‘आखिल पृथ्वीस आनंदमय करणारी नगरी’ असे म्हणत?”

¶ आमच्या बंदिवासाच्या बाराव्या वर्षाच्या दहाव्या महिन्याच्या पाचव्या दिवशी असे झाले की, यरूशलेमेमधून एक फरारी माझ्याकडे आला व म्हणाला, “नगर काबीज झाले आहे.”

¶ तो जेव्हा जवळ आला व त्याने शहर पाहिले, तेव्हा तो त्यासाठी रडला आणि म्हणाला,