TSK

TSK · यश 37:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

ते यशयाला म्हणाले, “हिज्कीया म्हणतो, ‘हा संकटाचा मानहानीचा व धिक्काराचा दिवस आहे. मूल जन्माला येत आहे पण प्रसूतीची शक्ती नसावी तसे झाले आहे.

तू संकटात असता मला हाक मार, आणि मी तुला वाचवेन, आणि तू मला गौरव देशील.

मरीबा येथल्याप्रमाणे किंवा मस्साच्या दिवशी रानात केले तसे आपली मने कठीण करू नका,

कारण हा गोंगाटाचा, पायाखाली तुडवण्याचा आणि गडबडीचा दिवस सेनाधीश परमेश्वर, प्रभू याजकडून दृष्टांताच्या खोऱ्यात आला आहे. त्या दिवशी लोक भिंती फोडतील आणि डोंगराकडे ओरडतील.

जेव्हा एखादी स्त्री प्रसूतीची वेळ जवळ आली म्हणजे ती वेदनेने विव्हळते आणि आपल्या वेदनांमध्ये ओरडते, प्रभू, तसे आम्ही तुझ्यापुढे आहोत.

हे परमेश्वरा, आमच्यावर कृपा कर; आम्ही तुझी वाट पाहतो; रोज सकाळी तू आमचा भुज हो, आमच्या संकटकाळी आमचा उद्धारक हो.

हायहाय! तो दिवस महान आहे, त्याच्यासारखा कोणताही नाही. तो याकोबासाठी चिंतेचा समय आहे, पण त्यातून त्यांचे रक्षण होईल.

प्रसूतिवेदना त्याच्यावर येतील, पण तो अक्कलशून्य मुलगा आहे, कारण जन्म घेण्याच्या वेळी तो गर्भातून बाहेर येत नाही.