TSK

TSK · यश 44:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

पण यशुरुन पुष्ट होऊन लाथा झाडू लागला. तो धष्टपुष्ट झाला! तो लठ्ठ झाला, तो तुकतुकीत झाला आणि त्याने आपल्या तारणकर्त्या देवाचा त्याग केला! आपले तारण करणारा दुर्गासारखा परमेश्वर तुच्छ मानला.

देव तिच्यामध्ये आहे; ती हलणारच नाही; देव तिला मदत करील आणि तो हे खूप लवकरच करील.

याहो या, आपला निर्माणकर्ता परमेश्वर यापुढे गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्यास नमन करू;

हे किटका, याकोबा आणि इस्राएलाच्या मनुष्या; घाबरू नको. मी तुम्हास मदत करीन ही परमेश्वराची घोषणा आहे, इस्राएलाचा पवित्र प्रभू, तुमचा उद्धारक आहे.

घाबरू नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी पूर्वेपासून तुझी संतती आणीन, आणि पश्चिमेकडून तुला एकत्र गोळा करीन.

या लोकांस मी आपल्यासाठी निर्मिले, त्यांनी माझी स्तुतिस्तोत्रे कथन करावी.

तुझा उद्धारक, ज्याने तुला गर्भावस्थेपासून घडवले तो परमेश्वर, ज्याने सर्वकाही निर्माण केले, जो एकटा आकाश पसरतो, ज्या एकट्याने पृथ्वी तयार केली तो म्हणतो मीच परमेश्वर आहे.

¶ अहो द्विपांनो, माझे ऐका! आणि दूरदूरच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनो, लक्ष द्या. माझ्या आईने मला जगात आणले असताच, मी जन्मताच परमेश्वराने मला बोलावले आहे.

तू जन्मला त्या दिवशी तुझी नाळ कापली नाही, तुला पाण्याने स्वच्छ केले नाही, किंवा मिठ लावून चोपडले नाही, किंवा बाळंत्याने गुंडळले नाही, तुझा जन्म झाला त्या दिवशी तुझा तिव्र तिटकारा येऊन तुला उघड्यावर फेकून दिले.

¶ ‹हे लहान कळपा भिऊ नको, कारण तुम्हास त्याचे राज्य द्यावे यामध्ये स्वर्गीय पित्याला संतोष वाटतो.›

देवाने ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांना जगाच्या रचनेपूर्वीच निवडले यासाठी की आम्ही त्याच्या समक्षतेत पवित्र आणि निर्दोष असावे.

तर मग आपण देवाच्या कृपेच्या राजासनाजवळ निर्धाराने जाऊ या. यासाठी की, आमच्या गरजेच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून आम्हास दया व कृपा प्राप्त व्हावी.