TSK

TSK · यश 8:9

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

इस्राएलच्या राजाचे त्यास उत्तर गेले. त्यामध्ये म्हटले होते. “बेन-हदादला जाऊन सांगा की, जो चिलखत चढवतो त्याने, जो ते उतरवण्याइतक्या दीर्घ काळापर्यंत जगतो त्याने इतकी फुशारकी मारू नये.”

दुष्टांना शासन झाल्यावाचून राहणार नाही याची खात्री बाळगा, परंतु नीतिमानांच्या वंशजांना सुरक्षित ठेवले जाईल.

दुष्टाची काठी, अधिकाऱ्याचा जो राजदंड, तो परमेश्वराने मोडला आहे.

लोकांस परमेश्वराचे बोलणे परक्या भाषेसारखे अनाकलनीय वाटले. हुकूमावर हुकूम, हुकूमावर हुकूम, नियमावर नियम, नियमावर नियम, थोडे इकडे, थोडे तिकडे, एक धडा तिकडे. लोकांनी स्वत:ला पाहिजे ते केले. म्हणून ते मागे पडून पराभूत झाले, ते सापळ्यात अडकले आणि पकडले गेले.

पाहा, जर कोणीएक अशांतता निर्माण करीत असेल, तर ती माझ्यापसून नाही; कोणीएक तुझ्याबरोबर अशांतता निर्माण करतो तो अपयशात पडेल.

तुम्ही स्वारांनो घोडे जुंपून त्यावर बसा, तुमच्या शिरावर शिरस्त्राण घालून तुमची जागा घ्या. भाल्यांना धार करा आणि तुमचे चिलखत घाला.

“सज्ज व्हा! हो! तुम्ही स्वत: आणि तुम्हास येऊन मिळालेली सैन्य ह्यांनी तयार राहा. आणि तू त्यांचा सेनापती हो.

म्हणून तू चढून येशील, तू वादळासारखा येशील. देशाला झाकणाऱ्या ढगासारखा तू होशील, तू आणि तुझ्याबरोबरचे सैन्य व तुजसह अनेक राष्ट्रांचे लोक असे तुम्ही त्यासारखे व्हाल.”

राष्ट्रांमध्ये ही घोषणा कराः युध्दाला सज्ज व्हा, बलवान मनुष्यांना उठवा, त्यांना जवळ येऊ द्या, सर्व लढवय्ये मनुष्ये पुढे येवोत.

¶ पाहा! परमेश्वराच्या न्यायाचा दिवस येत आहे. तुम्ही लुटलेली संपत्ती त्या दिवशी तुमच्या शहरात वाटली जाईल.

आणि तो पृथ्वीच्या चारी कोपऱ्यांतील गोग व मागोग या राष्ट्रांना, लढाईसाठी एकत्र करावे म्हणून तो त्यांना फसवायला बाहेर निघेल; त्यांची संख्या समुद्राच्या वाळूइतकी आहे.