TSK

TSK · ईयो 12:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

देव खूप विद्वान आहे आणि त्याची शक्ती अमर्याद आहे. देवाचे मन कठीण करून कोण निभावेल?

त्याच्या ठायी ज्ञान आणि सामर्थ्य आहेत. जिंकणारे आणि हरणारे सर्वच देवाच्या अधिन आहेत.

¶ मग बरखेल बूजी याचा पुत्र अलीहू याने उत्तर दिले, तो म्हणाला, मी तरूण आहे व तुम्ही वृद्ध आहात. म्हणून मी तुम्हास बोलण्याची हिम्मत केली नाही आणि माझे मत बोलून दाखवले नाही.

देव अतिशय सामर्थ्यवान आहे, पण तो लोकांचा तिरस्कार करीत नाही तो सामर्थ्यवान असून फार सूज्ञ आहे.

आमचा प्रभू महान आणि सामर्थ्यात भयचकीत कार्ये करणारा आहे; त्याची बुद्धी मोजू शकत नाही.

चांगला सल्ला आणि सुज्ञान ही माझी आहेत; मला ज्ञान आहे आणि सामर्थ्य ही माझी आहेत.

परमेश्वराचे मन कोणाला समजले आहे किंवा त्याचा सल्लागार म्हणून कोणी सूचना दिल्या आहेत?

ज्याने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी निर्माण केली आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्याने जग निर्माण केले आपल्या समंजसपणाच्या आधारे आकाश पांघरले.

‹कारण मी तुम्हास असे शब्द व अशी बुद्धी देईन की ज्यामुळे त्यांना तुमचा विरोध करायला किंवा तुमच्याविरुध्द बोलायला मुळीच जमणार नाही.›

परंतु ज्यांना बोलावलेले आहे, अशा यहूदी व ग्रीक दोघांसही ख्रिस्त हा संदेश आहे तो देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान असाही आहे.

¶ देवाचे लोक म्हणून आम्ही पूर्वीच ख्रिस्तामध्ये त्याच्या योजनेप्रमाणे नेमले गेलो होतो, जो सर्व गोष्टी हेतुपूर्वक त्याच्या इच्छेप्रमाणे करतो,

¶ म्हणून जर तुमच्यातील कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने देवाकडे मागावे म्हणजे ते त्यास मिळेल कारण तो दोष न लावता सर्वांस उदारपणे देतो.