TSK

TSK · ईयो 21:22

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

पहा, देवाच्या नजरेत आकाशही स्वच्छ नाही, खरोखर, देव त्याच्या पवित्र जनांचाही विश्वास करत नाही.

‘देवाने आम्हास आकाशातील पशुपक्ष्यांपेक्षा शहाणे बनवले आहे तेव्हा तो कुठे आहे?’ पृथ्वीवरील जंगली प्राण्यापेक्षा जो मला अधीक शिकवतो,

त्याच्या मार्गाबद्दल त्यास कोण सुचीत करील? ‘देवा तू अयोग्य केलेस’ असे कोणी त्यास म्हणू शकत नाही.

“तू सर्वशक्तिमान देवाशी वाद घातलास. तू मला चूक केल्याबद्दल दोषी ठरवलेस. आता तू चुकलास हे तू कबूल करशील का? तू मला उत्तर देशील का?

आमचा देव परमेश्वर यासारखे कोण आहे, त्याच्यावर कोणाचे राजासन आहे,

परमेश्वराचे मन कोणाला समजले आहे किंवा त्याचा सल्लागार म्हणून कोणी सूचना दिल्या आहेत?

जो कोणी आपल्या निर्मात्याशी वाद घालतो त्यास हायहाय! मातीच्या खापरांमध्ये एक खापर असा तो आहे. तू काय करतोस, असे चिखल आपल्या घडणाविऱ्याला म्हणेल काय? किंवा तुला हात नाहीत काय जेव्हा तू हे करतो?

असे नियमशास्त्रात लिहिले आहे; ‘कारण प्रभूचे मन कोणी ओळखले आहे? किंवा त्याचा सल्लागार कोण होता?

आपण देवदूतांचा न्याय करणार आहोत, हे तुम्हास माहित नाही काय? तर या जीवनासंबंधीचा न्याय किती विशेषेकरून आम्ही करू शकणार नाही?

आणि ज्या देवदूतांनी आपले अधिकारपद न सांभाळता आपले स्वतःचे योग्य वस्तीस्थान सोडले त्यांना त्याने सर्वकाळच्या बंधनामध्ये निबीड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरिता राखून ठेवले आहे;

मग मी मृतांना, लहान व मोठे ह्यांना राजासनासमोर उभे राहिलेले बघितले; तेव्हा पुस्तके उघडली गेली; नंतर आणखी एक पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे पुस्तक होते; आणि त्या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टींवरून ज्यांच्या त्यांच्या कामांप्रमाणे मृतांचा न्याय करण्यात आला.