TSK

TSK · ईयो 21:28

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

मोशेने सर्व लोकांस बजावले, या दुष्टांच्या तंबू पासून दूर जा. त्यांच्या कोणत्याही वस्तुला हात लावू नका. जर तुम्ही हात लावला तर त्यांच्या पापामुळे तुमचाही नाश होईल.

जे तुझा द्वेष करतात ते लज्जेची वस्त्रे घालतील, दुष्ट मनुष्यांची राहूटी नष्ट होइल.”

परंतु त्याच्या विष्ठेप्रमाणे त्याचा नाश होईल. जे लोक त्यास ओळखतात ते विचारतील, ‘तो कुठे गेला?’

त्याने जर असे केले तर मी जे काही केले त्याचे स्पष्टीकरण देऊ शकेन. एखाद्या पुढाऱ्याप्रमाणे माझे मस्तक उंच करून मी त्याकडे येऊ शकेन.

त्याप्रमाणे देव तुझा सर्वकाळ नाश करील; तो तुला वर घेऊन जाईल आणि आपल्या तंबूतून उपटून बाहेर काढेल आणि तुला जिवंताच्या भूमीतून मुळासकट उपटून टाकील.

सेनाधीश परमेश्वर म्हणतो: मी हा पट चोरांच्या आणि माझ्या नावाने खोटी वचने देणाऱ्या लोकांच्या घरी पाठवीन. तो तेथेच राहील आणि त्या घरांचा नाश करील. दगड व लाकडी खांबांचासुध्दा नाश होईल.”