ईयो 22:9
TSK
तू विधवांना काहीही न देता घालवून दिले असशील, पोरक्याचे बाहू मोडले असशील.
TSK
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
तू विधवांना काहीही न देता घालवून दिले असशील, पोरक्याचे बाहू मोडले असशील.
का? कारण जेव्हा एखादा गरीब मदतीची याचना करायचा तेव्हा मी त्यास मदत करीत असे आणि पोरक्या मुलाकडे लक्ष द्यायला कोणी नसले तर मी त्यास मदत करीत असे.
जुन्या सीमेचा दगड काढू नको; किंवा अनाथाची शेती बळकावू नको.
त्यांनी आपल्या आईबापांचा अनादर केला आहे. व त्यांनी तुमच्यामध्ये विदेशांच्या कारवाया केल्या आहे. तुमच्यातील विधवा आणि अनाथांना त्यांनी तुमच्या वाईट वागणुक दिली आहे.
त्यांचे हात दुष्कृत्ये करण्यात पटाईत आहेत. अधिकारी पैसे मागतात व न्यायाधीश लाच घेण्यास तयार आहेत. सामर्थ्यवान मनुष्या दुसऱ्याला आपल्या जिवाची वाईट इच्छा बोलून दाखवतो. असे ते एकत्र येऊन योजना करतात.