TSK

TSK · योहा 11:6

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

म्हणून तो त्यांच्यापासून बाजूला जाऊन रडला. थोड्या वेळाने तो परत त्यांच्याकडे आला आणि त्यांच्याशी बोलला. त्याने शिमोनाला त्यांच्यातून काढून घेतले आणि त्यांच्या नजरेसमोरच त्यास बांधले.

¶ मग योसेफाने आपल्या कारभाऱ्याला आज्ञा देऊन म्हटले, “या लोकांच्या गोणीमधे जेवढे अधिक धान्य मावेल व त्यांना नेता येईल तेवढे भर. आणि त्यासोबत प्रत्येकाचे पैसेही त्या पोत्यात ठेव.

तरीही परमेश्वर तुमच्यावर दया करावी म्हणून वाट पाहील. तुम्हावर दया दाखवावी म्हणून तो उंचावला जाईल, कारण परमेश्वर न्यायाचा देव आहे, जे सर्व त्याची वाट पाहतात ते आशीर्वादीत आहेत.

तेव्हा एक कनानी स्त्री त्या भागातून येशूकडे आली. ती स्त्री ओरडून म्हणाली, “प्रभू, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भूताने फार पिडलेली आहे.”