TSK

TSK · योहा 18:25

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

नंतर सारा नाकारून म्हणाली, “मी हसले नाही,” कारण ती फार घाबरली होती. त्याने उत्तर दिले, “नाही, तू हसलीसच.”

¶ यावेळी पेत्र वाड्याच्या अंगणात बसला होता. महायाजकाच्या दासीपैकी एक दासी पेत्राकडे आली. ती म्हणाली, “तू सुद्धा गालील प्रांताच्या येशूबरोबर होतास.”

¶ नंतर येशू आला आणि त्यांना झोपलेले पाहिले. तो पेत्राला म्हणाला, ‹“शिमोना, तू झोपी गेलास काय? तासभर तुझ्याच्याने जागे राहवत नाही काय?›

तेव्हा कोणाएका दासीने तेथे त्यास विस्तवाच्या उजेडात बसलेले पाहिले. तिने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि ती म्हणाली, “हा मनुष्यही त्याच्याबरोबर होता.”

थोड्या वेळानंतर दुसऱ्या मनुष्याने त्यास पाहिले आणि म्हणाला, “तू सुद्धा त्यांच्यापैकी एक आहेस!” पण पेत्र म्हणाला, “गृहस्था, मी नाही!”

¶ आणि त्यानंतर, केफा अंत्युखियास आला असता, मी त्याच्यासमोर त्यास आडवा आलो, कारण तो दोषीच होता.