TSK

TSK · योहा 5:44

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

पण परमेश्वर त्यांना म्हणाला, ‘दावीद माझ्या नावाने मदिर बांधायचा विचार तुझ्या मनात आला हे चांगले झाले.

‹ते त्यांचे सर्व कामे लोकांनी पाहावे म्हणून करतात कारण ते आपली स्मरणपत्रे रूंद करतात आणि आपल्या झग्यांचे काठ मोठे करतात.›

‹तेव्हा तो त्यास म्हणाला, ‘चांगल्या दासा, छान केलेस, तू थोडक्यांविषयी विश्वासू झालास, म्हणून तू दहा नगरांवर अधिकारी होशील.’›

‹तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? याचे कारण हेच की, तुमच्याकडून माझे वचन ऐकवत नाही.›

‹सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच, खरा देव त्या तुला आणि ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे.›

पण प्रत्येक चांगले करणार्‍या प्रथम यहूद्याला आणि मग ग्रीकास गौरव, शांती व सन्मान ही मिळतील.

कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाशी वैर आहे; कारण ते देवाच्या नियमाला अंकित होत नाही आणि त्यास खरोखर, होता येत नाही.

कारण स्वतःची प्रशंसा करणारा स्वीकृत नाही पण प्रभू ज्याची प्रशंसा करतो तोच स्वीकृत आहे.

¶ आणि तुम्ही विरोधाने किंवा पोकळ अभिमानाने काही करू नका, पण मनाच्या लीनतेने आपल्यापेक्षा एकमेकांना मोठे मानावे.

¶ माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे तुम्ही पक्षपाताने वागू नका