TSK

TSK · योहा 7:24

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

या न्यायाधीशांना मी त्यावेळी सांगितले की तुमच्या भाऊबंदांतील वाद नीट ऐकून घ्या. निवाडा करताना पक्षपात करू नका मग तो वाद दोन भावांमधला असो की एखादा मनुष्य व त्याचा भाऊबंद व उपरी यांच्यातील असो. नीतिने न्याय करा.

अहो अधिकाऱ्यांनो, तुम्ही खरोखर योग्य न्याय करता का? अहो मनुष्याच्या मुलांनो, तुम्ही सरळपणे न्याय करता का?

जे दुष्टपणाचे राजासन कायद्याने अरिष्ट योजते ते तुझ्याशी संबंध ठेवाल काय?

¶ हेही शहाण्या मनुष्याचे शब्द आहेत. न्यायात पक्षपात करणे चांगले नाही.

परमेश्वराचे भय त्याचा हर्षोल्हास होईल; त्याच्या डोळ्यांनी काय पाहिले त्यावरून तो न्याय करणार नाही, त्याच्या कानांनी काय ऐकले यावरुन तो निर्णय करणार नाही.

¶ माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे तुम्ही पक्षपाताने वागू नका

पण तुम्ही पक्षपात बाळगीत असाल तर तुम्ही पाप करता आणि उल्लंघन करणारे म्हणून नियमशास्त्राकडून तुम्ही दोषी ठरवले जाता.