ते एकमेकांना म्हणाले, “खरोखर आपण आपल्या भावाविषयी अपराधी आहोत. कारण आपण त्याच्या जिवाचे दुःख पाहिले तेव्हा त्याने काकुळतीने रडून आपणास विनंती केली, परंतु आपण त्याचे ऐकले नाही. त्यामुळेच आता आपणांस हे भोगावे लागत आहे.”
TSK
TSK · योहा 8:9
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
तेव्हा ती स्त्री म्हणाली, “एलीया, तू तर देवाचा मनुष्य आहेस, मला तुझी काही मदत होईल का? की माझ्या पापांची आठवण द्यायलाच तू आला आहेस? की माझ्या मुलाला मारायला आला आहेस?”
दुष्टांचा जयजयकार फार कमी काळासाठी असतो, अधर्म्याचा आनंद केवळ क्षणिक असतो.
राष्ट्रे त्यांच्याच खणलेल्या खाचेत पडली आहेत; त्यांनी लपून ठेवलेल्या जाळ्यात त्यांचाच पाय गुंतला आहे.
तुम्ही वाईट गोष्टी करता आणि तरीही मी गप्प राहिलो. मी तुझ्यासारखा आहे असे तुला वाटले, परंतू मी तुझा निषेध करणार आणि तुझ्या डोळ्यापुढे ओळीने सर्वकाही मांडणार.
त्याचप्रमाणे, तुझ्या स्वतःच्या मनास तुला माहित आहे तुम्ही सुध्दा इतरांना वारंवार शाप दिले आहेत.
¶ आणि त्यादरम्यान हजारो लोकांचा समुदाय जमला होता आणि एवढा की ते एकमेकांना तुडवू लागले, तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांशी बोललाः ‹“परूश्यांच्या खमिराविषयी जपा, म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी जपा.›
नंतर पहाटेस तो पुन्हा परमेश्वराच्या भवनात आला, तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला.
¶ पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, ‹“मीच जगाचा प्रकाश आहे; जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”›
व्यभिचार करू नये, असे जो तू सांगतोस तो तू व्यभिचार करतोस काय? जो तू मूर्तींचा विटाळ मानतोस तो तू देवळे लुटतोस काय?