TSK

TSK · लेवी 4:34

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

मग याजकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन ते आपल्या बोटाने होमवेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.

परमेश्वर आपल्या न्यायीपणामुळे आणि नियमशास्त्र वैभवशाली केल्याने खूश झाला.

¶ म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असणाऱ्यांना दंडाज्ञा नाही. ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात.

¶ कारण ख्रिस्त हा विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला नीतिमत्त्वासाठी नियमशास्त्राचा शेवट आहे.

देव, ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि ज्याच्या गौरवासाठी सर्व गोष्टी आहेत, त्याच्या गौरवाचे भागीदार होण्यासाठी पुष्कळ पुत्र व कन्या आणाव्यात म्हणून देवाने येशूला दुःखसहनाद्वारे परिपूर्ण करून लोकांचा तारणारा बनविले.

कारण तुम्हास माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांनी लावून दिलेल्या निरर्थक आचरणातून चांदीसोन्यासारख्या नाशवंत गोष्टीद्वारे, तुमची सुटका केली गेली नाही.

कारण, आपल्याला देवाकडे आणण्यास ख्रिस्तसुद्धा पापांसाठी, नीतिमान अनीतिमान लोकांसाठी, एकदा मरण पावला. तो देहाने मारला गेला, पण आत्म्याने जिवंत केला गेला.